Saturday, October 25, 2025
Happy Diwali

शेअर बाजाराची चांगली सुरुवात

मुंबई : आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्स ३६० अंकांनी वधारला आणि सेन्सेक्सने ५९ हजार अंकाचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीने १०७ अंकाने उसळण घेतली.

अमेरिकेत मागील ४० वर्षातील सर्वाधिक महागाई नोंदवण्यात आल्यानंतरही अमेरिकन शेअर बाजार वधारला असल्याचे दिसून आले. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. आशियाई शेअर बाजारही आज तेजीत असल्याचे दिसून आले.

आज बाजार सुरू झाला तेव्हा निफ्टी ५० मधील तब्बल ४९ कंपन्यांच्या शेअरचे दर वधारले होते. फक्त बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये एक टक्क्यांच्या आसपास घसरण दिसून आली.

Comments
Add Comment