Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीकोरोनाचे नियम पायदळी तुडवत सिने कलाकारांची 'सारा' पार्टी

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत सिने कलाकारांची ‘सारा’ पार्टी

आयोजकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवत सिने कलाकारांसह तरुण तरुणींनी मोठी गर्दी केली होती. कॅनेडियन रॅपर एबी ढिल्लोनच्या गाण्यावर सगळेच थिरकले. पण सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा अभाव सगळीकडे दिसला. यामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटी आघाडीवर असल्याचे दिसले. या पार्टीत सारा अली खान, (Sara Ali Khan) सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) उपस्थित होते. या व्यतिरिक्त अन्य काही सेलिब्रिटी देखील या ठिकाणी उपस्थित होते.

माध्यमांनी बातमी दिल्यानंतर या पार्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून इतक्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात, यामुळे ही पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यानंतर पोलिसांनी दखल घेत कारवाई केली. पोलिसांनी लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. कॅनेडियन रॅपर ढिल्लोनच्या (AP DHILLON) लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर याचे व्हीडिओ व्हायरल झाले.

राज्यभरात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असताना अशा प्रकारची लाईव्ह कॉन्सर्ट पार पडणं, पोलिसांनी याची परवानगी देणं, सेलिब्रिटींनी या ठिकाणी गर्दी करणं, या सगळ्यावर प्रश्न उभे राहतात. सध्या मुंबईत कलम १४४ लागू आहे. अशा वेळी सांताक्रूझमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये ही पार्टी झाली. त्यात मुंबईतील बड्या हस्तींनी हजेरी लावली. अशा वेळी नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -