Saturday, May 10, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह

अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर आणि तिची खास मैत्रिण अमृता अरोरा या दोघींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोघीही कोरोना संदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसवत आपल्या मित्रमैत्रिणींसोबत अनेक पार्ट्यांना उपस्थित होत्या. तिथे त्या अनेकांशी संपर्कात आल्या होत्या.


करीना आणि अमृता यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेने या दोघींच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. आता या दोघींच्या संपर्कात कोणकोण आले होते, याचा शोध महापालिका घेत आहे.


गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघी अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत करिष्मा कपूर, मलायका अरोरा देखील होत्या. अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये देखील या दोघीजणी सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्या सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


या दोघींच्या संपर्कात आलेल्या काही कलाकारांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट येणार आहेत. त्यांच्या रिपोर्ट्सकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांची नावे असल्याची माहीती मिळते.

Comments
Add Comment