Tuesday, May 6, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

म्हाडा पेपरफुटी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविपची निदर्शने

म्हाडा पेपरफुटी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविपची निदर्शने

मुंबई : म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.


तर, अभाविपच्या या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.


आरोग्य विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या परीक्षा पेपरफुटीचे रॅकेट समोर आले आहे. यामधील मराठवाडा कनेक्शनही पुन्हा एकदा समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेतही जालना मधील दोन आणि औरंगाबाद येथील एका व्यक्तीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती.


आताच्या प्रकरणात औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. यामुळे औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment