मुंबई : सोमवारी मुंबईत २ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून १७४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७,६५,४७१ वर पोहोचली आहे. सोमवारी १९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ७,४४,७८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
विशेष म्हणजे मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्य कमी झाली असून १७५१ पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी २५५७ दिवस झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील ०.०२ पर्यंत खाली आला आहे.