Tuesday, July 1, 2025

नागपुरात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

नागपुरात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण


नागपूर : भारतात कोरोना विषाणुचा ओमायक्रॉन व्हेरीयंटचा धोका वाढत चालला असून ओमायक्रॉन स्टेन नागपुरात येवून ठेपला आहे. नागपुरातील एका रुग्णाला ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती पुढे आली आहे.


यासंदर्भात माहिती देताना नागपुरातील एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, सदर ४० वर्षीय रुग्ण काही दिवसांपूर्वी दक्षिण अफ्रिकेहून परतला होता. गेल्या ८ दिवसांपासून सदर रुग्ण गृहविलगीकरणात होता. यादरम्यान केलेल्या चाचणीत हा रूग्ण पॉझिटिव्ह असून त्याला ओमायक्रॉन स्टेनचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले. सदर रुग्णास नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांची आरटी पीसीआर टेस्ट करण्यात आली. मात्र, ते सर्वजण निगेटिव्ह आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >