नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “शरद पवार जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना. “
राजकीय विरोधापलीकडे जाऊन पंतप्रधान नरेंद मोदी आणि शरद पवार यांनी सौहार्द पूर्ण संबंध ठेवले आहेत. दोन्ही मान्यवरांमध्ये परस्पर आदर कायम आहे. अनेक मंचावरून पंतप्रधान नरेंद मोदींनी शरद पवार यांच्या कामाची स्तुती केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील नरेंद्र मोदी शरद पवार यांचे मार्गदर्शक घेत असत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीला भेट सुद्धा दिली होती.