मुंबई (प्रतिनिधी) : लेबनॉन येथे झालेल्या आशिया ओशेनिया ज्युदो स्पर्धेत भारताने ४ रौप्य व ८ कांस्य अशी १२ पदके पटकावली. कॅडेट व ज्युनियर या दोन गटात झालेल्या स्पर्धेत भारताचा ३१ सदस्यीय संघ सहभागी झाला होता. ज्यात पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी येथे सराव करणारी श्रद्धा चोपडेचा समावेश होता. संघ प्रशिक्षक म्हणून पुण्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक योगेश धाडवे यांनी काम केले.
पदक विजेते खालीलप्रमाणे
कॅडेट गट- १) तंनू मान – ४८ किलो वजनी गट – रौप्य पदक. २) तनिष्ठा टोकस – ५२ किलो वजनी गट – कांस्य पदक. ३)लिंथोई – ५७ किलो वजनी गट – कांस्य पदक. ४) नंदिनी वत्स – ७० किलो वजनी गट – कांस्य पदक. ५) अनुराग सागर-५० किलो वजनी गट – कांस्य पदक. ६) शीतल सिंग – ८१ किलो वजनी गट – कांस्य पदक. ७) अनिल – ९० किलो वजनी गट – कांस्य पदक.
ज्युनियर गट – १) यश घनगस १०० किलो वजनी गट – रौप्य पदक. २) लिंथोई- ५७ किलो वजनी गट – रौप्य पदक. ३) उन्नती शर्मा- ६३ किलो वजनी गट – रौप्य पदक. ४) रेबिना- ७० किलो वजनी गट – कांस्यपदक. ५) इशरूप – ७० किलो वजनी गट – कांस्यपदक.
स्पर्धेत उझबेकिस्तानने कॅडेट गटात ९ सुवर्णपदके मिळवून, तर ज्युनियर गटात ७ सुवर्णपदके मिळवून सांघिक विजेतेपद मिळवले. कझाकिस्तानने कॅडेट गटात व ज्युनियर गटात प्रत्येकी ३ सुवर्णपदके मिळवून उपविजेतेपद मिळवले.