मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेने भाजप आमदार आशिष शेलारांविरुद्ध बॅनरबाजी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. या प्रकरणी नितेश राणे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. रात्रीच्या वेळी लिहायचे आणि आमच्या भाजप कार्यालयासमोर बॅनर लावायचा आणि स्वतःला वाघ म्हणून म्यॉव म्यॉव करायचं, अशी शिवसेनेची अवस्था झाली असल्याचे नितेश राणे म्हणाले.
भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटाबाबत वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला होता. दरम्यान शिवसेनेने भाजप आमदार आशिष शेलारांविरुद्ध बॅनरबाजी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. या प्रकरणी नितेश राणे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल जे वक्तव्य आशिष शेलार यांनी केलेच नाही, त्यावरून शिवसेनेने विनाकारण वाद निर्माण केला असल्याचे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान आशिष शेलार यांच्यावर टीका करणारे पोस्टर्स नरीमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोर रविवारी लावण्यात आले होते. या बॅनरवर वादग्रस्त ओळी लिहिण्यात आल्या आहेत.