नवी दिल्ली : पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. रॉस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल आणि काइल मायर्स अशी कोरोनाची लागण झालेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची नावे आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
वेस्ट इंडिजचा संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. ही मालिका १३ डिसेंबरपासून कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. मात्र, वेस्ट इंडिजच्या संघातील तीन प्रमुख खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते मालिकेला मुकणार आहेत. सध्या त्या तिघांना आयसोलेट करण्यात आल्याचे समजते.