Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणआंगणेवाडी जत्रा २४ फेब्रुवारीला

आंगणेवाडी जत्रा २४ फेब्रुवारीला

मसुरे (प्रतिनिधी) : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव २४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षीकोत्सवाची तारीख कधी ठरते याबद्दल दरवर्षी सर्वांनाच उत्सुकता असते. धार्मिक रीतीरिवाजानुसार जत्रेची तारीख ठरविण्याचा विधी झाल्यावर रविवारी सकाळी आंगणे कुटुंबिय यांच्याकडून जत्रेची तारीख जाहीर करण्यात आली. यावेळी, सर्व भाविकांना आंगणेवाडीत उपस्थित राहून देवीचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली आहे. सध्या श्री भराडी देवीच्या मंदिरात ६ डिसेंबर २०२१ पासून म्हणजेच देव दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक उत्सवात देवीची प्रथम ओटी भरणेपर्यंत देवीची ओटी भरणे, गोड पदार्थ ठेवणे, नवस फेडणे आदी विधी व कार्ये बंद ठेवण्यात आली आहेत.

श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाची अर्थात जत्रोत्सवाची उत्सुकता देश विदेशातील भक्तांना असते. विविध क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्ती या जत्रोत्सवास उपस्थिती दर्शवतात व देवीचे आशीर्वाद घेतात. रविवारी सकाळी देवीचा कौल घेऊन देवीच्या हुकमाने सदर तारीख ठरविण्यात आली आहे. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही हे सुद्धा आंगणेवाडी यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला यात्रोत्सव केवळ आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. देश विदेशात असलेले देवीचे लाखो भक्त या एका दिवसासाठी आंगणेवाडीत येऊन देवीचे दर्शन घेतात. परंतु, कोरोना महामारीमुळे या सर्व भक्तांना श्री भराडी मातेचे दर्शन घेता आले नव्हते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -