Friday, July 11, 2025

चिंचणी, वाणगावमध्ये उलटी, जुलाबाची साथ

डहाणू (वार्ताहर) : तालुक्याच्या किनारपट्टीवरील चिंचणी, वाणगाव, वरोर, तणाशी या गावांत उलटी-जुलाबाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतेक रुग्ण हे सरकारी रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.


चिंचणी, वाणगाव, वरोर, तणाशी, बाडा पोखरण, धाकटी डहाणू या भागात उलटी-जुलाबाने लोक हैराण झाले आहेत. ही साथ बदललेल्या वातावरणामुळे की, साखरा धरणातून गावात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे आली आहे, हे समजू शकलेले नाही.


पाण्याचे नमुने तपासल्यानंतर नेमके कारण समजू शकेल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >