Monday, August 25, 2025

पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक

मुंबई  : तांत्रिक कारणामुळे पश्चिम रेल्वेवर रविवार १२ डिसेंबरला जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन लाईनवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत सर्व जलद उपनगरीय ट्रेनना चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल लोकल स्थानकादरम्यान धीम्या लाईनीवर चालविण्यात येईल. ब्लॉकमुळे काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या बाबत अधिक माहिती संबंधित स्टेशन मास्तरांकडे मिळेल

Comments
Add Comment