मध्य रेल्वे कर्मचा-यांच्या समन्वयाने आरपीएफने पळून गेलेल्या ८६४ मुलांचा लावला शोध

  50

मुंबई : रेल्वे संरक्षण दल (RPF) ने टीटीई, जीआरपी, मध्य रेल्वेचे स्टेशन कर्मचारी यांच्या समन्वयाने जानेवारी ते नोव्हेंबर- २०२१ या कालावधीत मध्य रेल्वेवरील ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे परिसरातून पळून आलेल्या ८६४ मुलांची सुटका केली आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबासोबत जोडले.

यामध्ये ५३५ मुले आणि ३२९ मुलींचा समावेश आहे जे एकतर घरातून पळून गेले होते किंवा हरवले होते आणि आरपीएफने तिकीट तपासणी कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस, चाइल्डलाइन एनजीओ आणि प्रवाशांच्या मदतीने ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या आवारात सापडले होते.

यातील बहुतेक मुले काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर आली होती. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

मध्य रेल्वेवर जानेवारी ते नोव्हेंबर- २०२१ पर्यंत सुटका केलेल्या (शोधलेल्या) मुलांचे विभागनिहाय विभाजन खालीलप्रमाणे :

मुंबई विभाग ३२२ मुले (१९४ मुले आणि १२८ मुली)

पुणे विभाग ३०६ मुले (२१२ मुले व ९४ मुली)



भुसावळ विभाग १२८ मुले (७७ मुले व ५१ मुली).

नागपूर विभाग ६६ मुले (२८ मुले व ३८ मुली).

सोलापूर विभाग ४२ मुले (२४ मुले व १८ मुली).

मध्य रेल्वेवर नोव्हेंबर-२०२१ महिन्यात ५० मुले आणि २९ मुलींसह एकूण ७९ मुलांची सुटका करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र करण्यात आले.

मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आणि अशा प्रकरणांची माहिती कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचार्यांना किंवा जवळच्या चाइल्डलाइन एनजीओकडे किंवा हेल्पलाइन नंबर 1098 वर डायल करा आणि त्याद्वारे हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडण्यास मदत करण्याचे आवाहन करीत आहे.


Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.