Monday, October 20, 2025
Happy Diwali

एमआयएमची मुंबईत आज तिरंगा रॅली

एमआयएमची मुंबईत आज तिरंगा रॅली
मुंबई : मुस्लिम आरक्षणासाठी MIM पक्षाकडून तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे . मात्र मुंबईत प्रवेश नसल्याने मुंबईच्या सीमारेषेवर मुंबई पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत मुंबईच्या वेशीवर मुलुंड येथील आनंद नगर जकात नाका येथे नवघर पोलिस सह ,srpf राज्य राखीव पोलिस दल यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलाय.

सभेलाही पोलिसांची अद्याप परवानगी नाही

MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील चांदिवली परिसरात रॅली होणार आहे. या सभेलाही पोलिसांची अद्याप परवानगी नाहीये.. तरीही एमआयएम सभा घेण्यावर ठाम आहे. MIM ला सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलीय. 
Comments
Add Comment