मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या संदर्भात बोलू नये असे न्यायालयीन निर्देश असूनही मंत्र्यांनी त्याचे उल्लंघन केले होते. याचप्रकरणी त्यांना हा माफीनामा द्यावा लागलाय.
राज्य सरकारचे मंत्री वानखेडे कुटुंबियांना जाहीरपणे लक्ष्य बनवित असल्याने ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी नवाब मलिक यांनी कोर्टात हमीपत्र दिले होते की, ते समीर वानखेडे यांच्याबाबत बोलणार नाहीत. परंतु, रविवारी ५ डिसेंबर रोजी ट्विटर स्पेसवर आयोजित पत्रकार परिषदेत मलिकांनी वानखेडे यांच्याविषयी भाष्य केले होते. त्याचप्रमाणे मलिकांनी दादर येथील चैत्यभूमीवरही वानखेडे यांना उद्देशून वक्तव्य केले होते. त्यामुळे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. वानखेडे यांच्याविषयी न बोलण्याचे प्रतित्रापत्र न्यायालयात देऊनही त्यांनी वक्तव्य केल्याचे यामध्ये म्हटले होते. त्यावर उच्च न्यायालयाने मंगळवारी ७ डिसेंबर रोजी मंत्री नवाब मलिकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार आज, शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत नवाब मलिक यांचे वकील ऍस्पि चिनॉय यांनी न्यायालयात सांगितले की, मलिक यांनी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केलेली नाहीत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो, अशी बाजू मलिक यांनी मांडली आहे.