Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

सासरच्यांना खूश करण्यासाठी करायचा चोऱ्या

सासरच्यांना खूश करण्यासाठी करायचा चोऱ्या

मोनिश गायकवाड

भिवंडी : होऊ घातलेल्या सासरच्या मंडळींना खूश करण्यासाठी एका आरोपीने चक्क घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी या अट्टल चोरट्याने आपल्या भावी सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी घरफोड्या केल्या असून त्या आरोपीस अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले अाहे. त्याच्याकडून तब्बल ५ कार,५ मोटर बाईक, एक मंगळसूत्र असा ६ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात वाहन चोरीच्या घटनां मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने त्या बाबत पोलीस अधिकाऱ्यांनी गस्त घालण्याच्या सक्त सूचना पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी गस्त व नाकाबंदी केली जात असताना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना एक वाहन चोरी करणाऱ्याची माहिती गुप्त बातमीदारा कडून मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत,पो. नि. किरण काबाडी ,विक्रम मोहिते व निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र पाटील व पथकातील भोला शेळके ,किरण जाधव ,प्रसाद काकड,अमोल इंगळे,रवींद्र पाटील, श्रीकांत पाटील यांनी सापळा रचून भिवंडी शहरातील टेमघर परिसरात राहणारा शिवासिंग अमिरसिंग बावरी (२०) यास अटक केली आणि त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या ताब्यातून ५ कार, ५ दुचाकी व दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा मुद्देमाल जप्त करीत नारपोली, कल्याण ,डोंबिवली, कळवा, शिवाजी नगर अशा विविध पोलीस ठाण्यातील तब्बल अकरा गुन्ह्यांची उकल केली आहे .

शिवासिंग अमिरसिंग बावरी हा अल्पवयीन असल्या पासून सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल असून आरोपीचे पुढील महिन्यात लग्न असल्याने लग्नासाठी पैसे जमविणे आणि सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी त्याने घरफोडीचे गुन्हे केले. कार चोरी करून तिचा उपयोग तो घरफोडी करण्यासाठी करीत होता अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे .

Comments
Add Comment