Saturday, July 13, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेरोजगार इच्छुकांसाठी १२ ते १७ डिसेंबर पर्यंत ठाण्यात राज्यस्तरीय महारोजगार मेळावा

रोजगार इच्छुकांसाठी १२ ते १७ डिसेंबर पर्यंत ठाण्यात राज्यस्तरीय महारोजगार मेळावा

ठाणे : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने राज्यात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दि. १२ ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. इयत्ता नववी पास, दहावी व बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या युवक-युवतींनी यांनी सहभागी व्हावे, असे श्रीमती जावळे यांनी कळविले आहे.

संकेतस्थळाच्या मुख्य पानावरील नोकरी साधक (Job Seeker) लॉगीन मधून आपापल्या वापरकर्ता आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील राज्यस्तरीय मेगा रोजगार मेळावा २०२१ या टॅबवर क्लिक करावे. यानंतर उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रताधारण करीत असल्याची खात्रीकरुन उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.

ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त कविता ह. जावळे यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -