संजय राऊतांनी पोलिसांच्या गराड्यातून बाहेर येऊन दाखवावे : नितेश राणे

मुंबई  : खासदार संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकदा पोलिसांच्या गराड्यातून बाहेर निघून उभे राहावे, मग भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला इंगा दाखवतील, असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांना दिले आहे. राणे यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका करताना महिला अत्याचारावरून शिवसेनेलादेखील त्यांनी सुनावले आहे.



राऊतांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपले गुरू मानू नये आणि बोलू नये, असेही राणे म्हणाले. राऊत यांनी हिंमत असेल तर त्यांनी आपल्या शब्दावर ठाम राहावे आणि पोलिसांचा गराडा बाजूला करावा, मग जीभ कशी वापरायची हे भाजपचा कार्यकर्ता त्यांना दाखवून देईल, असा इशारा देताच राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्वत:चा गुरू म्हणवून घेऊ नये. राऊत ज्या प्रकारची विधाने करतात, त्यावरून त्यांच्या जिभेवर संशोधन व्हायला हवे. संजय राऊत यांच्या जिभेला हाड असेल आणि त्यांच्यामध्ये खरंच हिंमत असेल, तर त्यांनी पोलिसांच्या गराड्यातून बाहेर येऊन दाखवावे, असे नितेश राणे म्हणाले.



दरम्यान, विरोधकांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपने केली होती. त्यानुसार भाजप नगरसेवकांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Comments
Add Comment

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची