मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kirshori pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. महापौर झाल्यापासून पेडणेकर यांना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे.
हे पत्र पनवेलमधून कुरिअरद्वारे महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे. पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे पत्र अत्यंत अश्लिल भाषेत आहे, स्त्रीच्या प्रत्येक अंगाचा यात उल्लेख आहे. तसेच माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे घरच्यांना, मुलांना मारून टाकू, अशी भाषा पत्रात वापरण्यात आली आहे. पत्रामध्ये आत वेगळं नाव आणि पत्ता आहे. बाहेर पाकिटावर वेगळं नाव आणि पत्ता आहे. हे पत्र पनवेलहून पोस्ट करण्यात आले आहे.
दरम्यान मी या संदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे, असेही पेडणेकर म्हणाल्या. आशिष शेलार यांच्या संदर्भातील वाद वेगळा आहे, असेही पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी महापौर बंगल्यावर पोहोचले आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे.
किशोरी पेडणेकर यांना दुसऱ्यांदा ही धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी फोन कॉलवरून त्यांना धमकी देण्यात आली होती.
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…