
मुंबई : मुंबईतील धारावीत देखील आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आला होता. त्याचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे होते. या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली गेली आहे. आज धारावीतील एकाला आणि या अगोदर मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे . यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे.