
नवी दिल्ली : मेक्सिकोच्या चियापास राज्यातील दक्षिण-पूर्व मेक्सिकन शहराच्या गुटिएरेझजवळ रात्रीच्या सुमारास ट्रक उलटल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत ४९ जणांचा मृत्यू झाला तर ५८ जण जखमी झाले. जखमींना तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचाव कार्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिको राज्याची राजधानी चियापासकडे जाणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक हा स्थलांतरित नागरिकांना घेवून जात होता. या ट्रकमध्ये शंभरहून अधिक नागरिक होते.