Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेवाचा, महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने कशी केली कोरोनावर मात

वाचा, महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने कशी केली कोरोनावर मात

डोंबिवली येथील ओमायक्रॉन रुग्णाची प्रतिक्रिया

डोंबिवली : “कोरोना बाधित रुग्णांनी घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोनातून उपचार घ्यावेत आणि आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे म्हणजे तुम्ही नक्कीच त्यातून बाहेर पडाल, असे वक्तव्य महापालिकेच्या आर्ट गॅलरी कल्याण पश्चिम येथील विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज मिळालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिकेतून म्हणजे हाय रिस्क कंट्रीतून २४ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे आलेला हा प्रवासी कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य खात्याने त्यास तातडीने महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करून त्याची जीनोम सिक्वेन्स सिंग चाचणी केली असता सदर रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले होते. तो महाराष्ट्रातला पहिला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण ठरल्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे केंद्रीत झाले होते. सदर रुग्णावर उपचार चालू असताना त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला.

त्यावेळी सदर रुग्णाने उत्तम सेवा दिल्याबद्दल महापालिकेचे व आरोग्य विभागाचे खूप खूप आभार मानले. मला २४ तास डॉक्टर उपलब्ध होते, दर दोन तासांनी माझी सर्व प्रकारची तपासणी करून काळजी घेण्यात येत होती, असे त्याने डिस्चार्ज मिळताना सांगितले. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला डिस्चार्ज मिळाल्यामुळे महापालिकेच्या आर्ट गॅलरी येथील विलगीकरण केंद्रात या रुग्णाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -