जोधपूर : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा शाही विवाह सोहळा आज जोधपूर येथे संपन्न झाला. या सोहळ्याला कतरिना आणि विकीच्या काही मोजक्याच नातेवाईकांची उपस्थिती होती. या शाही विवाह सोहळ्यासाठी कतरिना कैफने भरजरी कॉश्च्यूम परिधान केले होते.
सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात ही रॉयल वेडिंग पार पडली. कतरिना -विकीच्या लग्नासाठी सिक्स सेन्सेस या राजमहालाच्या आवारात एक अतिशय भव्य मंडप तयार करण्यात आला. याच मंडपात लग्नाचे सर्व विधी पार पडले. .
नववधू आणि वराच्या एंट्रीसाठी रथ आणि घोडाही तयार करण्यात आला होता अशी चर्चा रंगतेय. कतरिना कैफने पारंपारिक डोलीमध्ये बसून मंडपात एंट्री घेतली. तर विकी कौशल हा घोड्यावर बसून मंडपात आला
आज दुपारी साधारण १ वाजता फेटा बांधण्याचा विधी झाला, . यावेळी नवरदेवाला अगदी शाही थाटात फेटा बांधला गेला…यानंतर विकी-कतरिनाने कुटुंब आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतल्या. . या लग्नासाठी उभारण्यात आलेला मंडप राजवाडा शैलीत बांधण्यात आला. तो अतिशय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता.
दरम्यान विकी आणि कतरिनाचा मेहंदी सोहळा ७ डिसेंबरला पार पडला. यात भरपूर पंजाबी गाणी आणि ढोल वाजवण्यात आले. तर ८ डिसेंबरला संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतर पाहुण्यांसोबतच विकी-कतरिनानेही डान्स केला. ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लाटफॉर्मला या रॉयल वेडिंगच्या वितरणाचे हक्क देण्यात आले आहेत.