मुंबई: गुरुवारी दुपारी चर्चगेट रेल्वे स्थानकातील सब वे ला आग लागल्याची घटना घडली. मात्र अग्निशमन दलाने अवघ्या तीस मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले.
दुपारी पावणे दोनच्या सुमारास चर्चगेट रेल्वे स्थानकच्या सब वे गेट क्रमांक ३ येथे आग लागली होती. त्यामुळे सब वे तून ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान काही वेळातच रेल्वे अधिकारी, पोलीस, बेस्ट व पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरवातीला आग नेमकी कुठे लागली हे समजत नव्हते. मात्र आग सब वे मध्येच लागल्याचे समजल्यानंतर अग्निशमन दलाने ३० मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.