Wednesday, July 2, 2025

परीक्षेसाठी गेलेली बोईसरची तरुणी मुंबईतून बेपत्ता

परीक्षेसाठी गेलेली बोईसरची तरुणी मुंबईतून बेपत्ता

बोईसर : मुंबईतील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी बोईसर येथील विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही तरुणी २९ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली आहे. सदिच्छा साने असे या तरुणीचे नाव असून प्रीलियम परीक्षा देण्यासाठी ती मुंबईला गेली होती. सदिच्छाचे अपहरण झाले असल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.



वैद्यकीय शिक्षण घेणारी सदिच्छा मनीष साने ही तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली होती. मात्र, ती २९ नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदिच्छा साने ही २२ वर्षीय तरुणी बोईसरमधील खोदारामबाग येथे राहत होती. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी सदिच्छा प्रीलियमची परीक्षा देण्यासाठी ती मुंबईला गेली होती. मात्र, ती घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


शेवटचे लोकेशन वांद्रे ब्रँडस्टॅण्ड



दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या प्रीलियमच्या पेपरलाही सदिच्छा पोहचली नसून तिचा अचानक फोन बंद आला असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सदिच्छाच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन वांद्रे ब्रँडस्टॅण्ड येथे दाखवण्यात येत आहे. त्या ठिकाणी तिला पाहणारा शेवटचा एक जीवरक्षक असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment