नवी दिल्ली : भारताने मंगळवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ चांदीपूर येथे ‘व्हर्टिकली लॉन्च्ड शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल’ (VL-SRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार हे क्षेपणास्त्र सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या शत्रूच्या लक्ष्यांना नष्ट करू शकते. डीआरडीओने म्हटले आहे की VL-SRSAM भारतीय नौदलासाठी विकसित केले गेले आहे, ज्याचा उद्देश सागरी-स्किमिंग लक्ष्यांसह सीमेवरील विविध हवाई धोक्यांना रोखण्याचा आहे.
डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, अतिशय कमी उंचीवर असलेले इलेक्ट्रॉनिक लक्ष्य नष्ट करण्यासाठी उभ्या लाँचरमधून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले.