Friday, October 11, 2024
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेने भारताचा घेतला धसका

दक्षिण आफ्रिकेने भारताचा घेतला धसका

जोहान्सबर्ग: मायदेशातील भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सीएसएने तब्बल २१ क्रिकेटपटूंचा ‘जम्बो’ संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उंचावलेल्या कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिका बोर्डाने (सीएसए) विराट आणि कंपनीचा धसका घेतल्याचे यावरून दिसत आहे.

रबाडा, नॉर्टजेसह ऑलिव्हियरचे पुनरागमन

दक्षिण आफ्रिका बोर्डाच्या राष्ट्रीय निवड समितीने मंगळवारी संघनिवड जाहीर केली. यजमान संघात कॅगिसो रबाडा, ऍन्रिच नॉर्टजे तसेच ड्युआनी ऑलिव्हर या वेगवान त्रिकुटाचे पुनरागमन झाले आहे. ऑलिव्हियर हा शेवटची कसोटी फेब्रुवारी २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. ब्रिटनमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत परतला. २९ वर्षीय ऑलिव्हियरने सीएसए चार दिवसीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली. यामुळे त्याला कमबॅक शक्य झाला. ऑलिव्हियरने ८ डावात ११.१४च्या सरासरीने २८ विकेट घेतल्या. ५३ धावांत ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

नव्या-जुन्यांचा समावेश

डीन एल्गरच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघात क्विंटन डी कॉक, ब्युरॉन हेन्ड्रिक्स, केशव महाराज, लुन्गी एन्गिडी, आयडन मर्करम, रॉसी वॅन डर ड्युसेन या अनुभवींसह अॅन्रिच नॉर्किया, ग्लेंडन स्टुर्मन, प्रीनीलॅन सुब्राये, सिसांडा मगाला आणि रायन रिकेल्टन यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे.

बायो-बबलमुळे अनेकांना संधी

बायो बबलमुळे बोर्डाकडून एवढ्या मोठ्या संख्येने क्रिकेटपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२२ या कालावधीत तीन कसोटी सामन्यांची मालिका होईल. ही मालिका आयसीसी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतर्गत(डब्लूटीसी) खेळली जात आहे. मालिकेतील सामने सेंच्युरियन, वाँडरर्स आणि न्यूलँड्स येथे खेळवले जातील. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर उभय संघांत तितक्याच सामन्यांची वनडे मालिका रंगेल. यापूर्वीच्या वेळापत्रकातर्गत भारताचा संघ चार कसोटींसह तीन वनडे तसेच चार टी-ट्वेन्टी सामने खेळणार होता. मात्र, ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या उदयामुळे दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. आता चारऐवजी तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. वनडे मालिका कायम असली तरी चार टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका स्थगित करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका बोर्डाने सोमवारी आगामी मालिकेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले.

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ :

डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बवुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कॅगिसो रबाडा, सॅरेल इर्वी, ब्युरॉन हेंड्रिक्स, जॉर्ज लिन्डे, केशव महाराज, लुन्गी एन्गिडी, आयडन मर्कराम, विआन मुल्डर, एन्रिच नॉर्किया, कीगॅन पीटरसन, रॉसी व्हॅन डर ड्युसेन, काइल व्हेरीन्नी, मार्को जॅन्सेन, ग्लेंटन स्टुर्मन, प्रीनेलेन सुब्रायन, सिसान्डा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -