Thursday, July 3, 2025

आगीत बीएमडब्ल्यूच्या ४५ गाड्या जळून खाक

आगीत बीएमडब्ल्यूच्या ४५ गाड्या जळून खाक

नवी मुंबई, : तुर्भे एमआयडीसीमधील प्लॉट नंबर डी-२०७ मध्ये बीएमडब्ल्यू गाड्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. त्यात जीवितहानी झाली नसली तरी ४० ते ४५ महागड्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील चार मजली कारच्या शोरूममध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली. यात शोरुम पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच कोपरखैरणे, नेरूळ आणि शिरवणे येथील १० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी, नेरूळ आणि सीबीडी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

या आगीत बीएमडब्ल्यू वर्कशॉपमधील ऑफिससह सर्व फर्निचर आणि कागदपत्रे देखील जळून खाक झालीत. तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आगीबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment