बोईसर : बोईसर येथील सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या सहा शाळांमध्ये बोगस भरती प्रक्रिया राबवून शिक्षकांची नेमणूक केल्याची तक्रार जि. प. पालघर शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
सेवा आश्रम शिक्षण संस्था मुरबे यांच्या बोईसर परिसरात ६ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू असून या ठिकाणी आवश्यक शिक्षक भरती करताना कोणत्याही प्रकारे जाहिरात न प्रसिद्ध करता तसेच शासनाच्या विहीत प्रक्रियेप्रमाणे मुलाखत न घेताच बिंदू नामावलीनिहाय बोगस शिक्षक भरती केल्याची तक्रार विक्रम धोडी यांनी पालघर जिल्हा परिषदेकडे केली असून तत्काळ ही भरती थांबवण्याची मागणी केली आहे.
पालघर हा पेसा जिल्हा असल्यामुळे भरती प्रक्रिया राबवताना सर्व जातीनिहाय आरक्षण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असताना सेवा आश्रम शिक्षण संस्थेचे फिट पर्सन समाधान सूर्यवंशी, व्ही. जी. पाटील आणि प्रकाश बापिस्कर यांनी कोरोना महामारी काळात कोणत्याही प्रकारे शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध न करताच उमेदवारांकडून लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण करून बोगस शिक्षक भरती राबवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व बोगस शिक्षक भरती प्रक्रियेत सेवा आश्रम शाळा बोईसरचे मुख्याध्यापक रविंद्र अनंत पिंपळे यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संस्थेमार्फत जि. प. पालघर यांच्याकडे जे शिक्षक भरतीचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत ते बोगस असल्याने सदर प्रस्ताव नामंजूर करण्याची मागणी विक्रम धोडी यांनी केली आहे. तसेच केलेली बोगस शिक्षक भरती थांबवण्यात येऊन यामध्ये सामील असणाऱ्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…
उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…