लांजा : लांजा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन २८ दिवस झाले तरी सुरूच असून या कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सहा कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यात इतरत्र बदल्या करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी दिली.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झाले पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन सुरु आहे. लांजा एसटी आगारातील कर्मचारी देखील ९ नोव्हेंबरपासून या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे लांजा आगाराचे मोठे नुकसान होत आहे.
२८ दिवसांचा कालावधी उलटला तरी एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. यातील काही कर्मचारी म्हणजे नऊ कर्मचारी हे कामावर हजर झाले आहेत. मात्र इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्याने आगाराला दररोज लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. या कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी प्रशासनाकडून यापूर्वी २२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर १८ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र तरीही संपकरी कर्मचारी मागे हटण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी ६ डिसेंबर रोजी कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ६ कर्मचाऱ्यांच्या खेड, राजापूर, रत्नागिरी आणि दापोली या ठिकाणी बदल्या करण्यात आलेल्या आहेत,