Friday, May 9, 2025

मनोरंजनरिलॅक्सताज्या घडामोडी

धक्कादायक! कतरिना-विकी कौशलच्या लग्नात सलमान बनला बॉडीगार्ड?

धक्कादायक! कतरिना-विकी कौशलच्या लग्नात सलमान बनला बॉडीगार्ड?

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या हायप्रोफाईल मॅरेजसाठी सुरक्षादेखील तितकीच तगडी ठेवण्यात आलीय आणि चक्क या दोघांच्या लग्नात सलमान खान बॉडी गार्ड म्हणून उपस्थित असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत असल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. मात्र आम्ही खास या फोटोचा खुलासा तुमच्यासाठी घेऊन आलोय. खरंतर हा फोटो म्हणजे मिम्स वायरल होतायत. कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नात सलमान लग्न मंडपाच्या बाहेर बॉडीगार्ड बनून उभं असल्याचं या फोटोत दिसतंय. सलमान हा कतरिनाचा एक्सबॉयफ्रेन्ड त्यामुळे नेटक--यांनी कतरिनाच्या लग्नात सलमानला टार्गेट करणं काही सोडलं नाही. सलमानचा हा फोटो क्षणात सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.



सेलिब्रिटींवर मिम्स वायरल होणं हे काही नवं नाही. पण कतरिनाच्या लग्नानिमित्त हा एकच फोटो वायरल होत नाहीए तर अशा अनेक फोटोंनी सोशल मीडियावर रान उठवलं आहे.



सलमानने जर विकीला असा प्रश्न विचारला असता तर त्याबाबतचे मिम्सदेखील वायरल होत आहेत.



कतरिना विकीच्या लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांची अवस्थाही अशीच होणार आहे.


९ डिसेंबरला हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार कतरिना आणि विकी कौशल यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होत आहे. आज मेहंदीने या ग्रँड लग्नसोहळ्याला सुरुवात होतेय आज कतरिनाच्या हातावर विकीच्या नावाची मेहंदी लागणार आहे.


Comments
Add Comment