Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोची साथ

मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोची साथ

५ दिवसात ११८ रुग्ण

मुंबई : वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस याचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला बसत असून केवळ ५ दिवसात मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या तब्बल ११८ रुग्णांची भर पडली आहे. लेप्टो, हेपिटायटीस, चिकनगुनीया आणि एच१एन१ हे आजार मात्र नियंत्रणात आले आहेत. मलेरियाचा जोर सर्वाधिक असून या आजाराचे ५६ रुग्ण सापडले आहेत. त्या खालोखाल डेंग्यूचे १२ तर गॅस्ट्रोची ५० जणांना बाधा झाली आहे.

नोव्हेंबर महिन्यात ही या आजारांनी हाहाकार माजवला होता. या एका महिन्यात मलेरिया ३२६, डेंग्यू १०६ तर गॅस्ट्रोच्या ३१३ रुग्णांची नोंद झाली होती. महानगरपालिकेने अनेक उपाययोजना करून देखील हे आजार फोफावत असून आजही मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत.

लेप्टो, हेपिटायटीस, चिकनगुनीया आणि एच१एन१ आजार मात्र नियंत्रणात आला आहे. लेप्टो आणि एच१एन१चा एकही रुग्ण सापडला नसून हेपिटायटीस ४ तर चिकनगुनियाचे २ रुग्ण आढळले आहेत. नोव्हेंबर महिन्यात लेप्टो १०, हेपिटायटीस ३७, चिकनगुनीया २० आणि एच१एन१चा एक रुग्ण सापडला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -