Friday, October 11, 2024
Homeताज्या घडामोडीआरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी वरिष्ठ अधिका-याला अटक

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी वरिष्ठ अधिका-याला अटक

 लातूर : लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनी आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचं स्पष्ट झालं आहे. बडगिरे याने त्याच्या विभागातील डॉक्टर संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर शाम म्हस्के या कर्मचाऱ्याकडून पाच लाख रुपये घेऊन हा पेपर फोडल्याच पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर हा पेपर राज्यभर व्हायरल करण्यात आला. 

पुणे सायबर पोलिसांनी या प्रकणाचा तपास करत लातूरमधील आरोग्य विभागाचा सीईओ, बीडच्या मनोरुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी, उस्मानाबाद आरोग्य विभागाचा क्लार्क आणि एक शिपाई यांना अटक केली आहे. सीईओने पेपर फोडला आणि या सर्वांचा या प्रकरणात समावेश असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. 

पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी सात जणांना अटक केलीय. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 11 झालीय.

आरोग्य विभागाच्या ‘गट ड’ या वर्गासाठी 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेला पेपर फुटल्याबद्दल पुणे सायबर क्राईमने गुन्हा दाखल करून घेतला आहे. आरोग्य विभागाच्या ‘गट ड’ परीक्षेचा पेपर परीक्षेआधी पेपर फोडून 100 पैकी 92 प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात पसरवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -