मुंबई : गदिमा प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठीत गदिमा पुरस्कार यंदा जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना दिला जाणार आहे. तर गदिमा प्रतिष्ठानाकडून देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार हा अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना देण्यात येणार आहे. नुकतंच गदिमा प्रतिष्ठानचे कार्यक्रारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली.
अभिनेते नाना पाटेकर गेल्या अनेक वर्षांपासून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त गावांना मदत करत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेतली आहेत. तसेच अनेक गावांना ते सढळ हस्ते मदत करतात. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा प्रतिष्ठित गदिमा पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.