मुंबई (प्रतिनिधी) : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा मंगळवारी जबाब नोंदवला. अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलीस अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात आला. अनिल देशमुखांशी निगडित असलेल्या खंडणी प्रकरणात कुंटे यांची चौकशी सुरू आहे. ईडीने याआधी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. ईडीने सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे अनिल देशमुख यांच्यासह अन्य काही लोकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना अहवाल सादर केला. त्यानंतर जयस्वाल यांनी हा अहवाल गृहविभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव कुंटे यांच्याकडे पाठवला, जेणेकरून या अहवालाच्या आधारे काय कारवाई करावी, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करता येईल. या अहवालावर सरकारने कार्यवाही केली नाही, असा आरोप आहे, त्यानंतर शुक्ला आणि जयस्वाल यांनी केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीचा पर्याय निवडला.