Saturday, October 18, 2025
Happy Diwali

९ घरे पेटवली, ३ संशयितांना पोलिसांकडून अटक

९ घरे पेटवली, ३ संशयितांना पोलिसांकडून अटक
धुळे शहरातील कबीरगंज परिसरातील जनता सोसायटीत काल मध्यरात्री झालेल्या भीषण अग्निकांड प्रकरणात अखेर तिघांच्या विरुध्द आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करणा-या नदीम काल्या उर्फ नदीम रज्जाक शेख याचा प्रमुख समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात रुक्साना बानो शेख सलीम रा.जनता सोसायटी या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मागील भांडणाच्या वादातून दाखल केलेली पोलिसातील तक्रार मागे घेतली नाही म्हणून नदीम काल्या उर्फ नदीम रज्जाक शेख सोबत हमीद नाट्या आणि वसीम रंधा या तिघांनी फिर्यादी रुक्साना बानो शेख हिची वहीनी नसीम बानो हिच्या घराचा दरवाजा उघडून घरात घुसून एका प्लॅस्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल ओतून माचीसने आग लावून दिली. त्यामुळे जनता सोसायटीतील ९ रहिवाशांची घरे जळून खाक झाली. यात हसीना बी असलम खाटीक यांच्या घरात ८ लाख, कान्नु अन्सारी अब्दुला अन्सारी यांच्या घरातील २ लाख, निसार शेख यासीन याच्या घरातील १० लाखाचे, मोहम्मद सलीम अब्दुल गफ्फार यांच्या घरात १० लाखाचे, मोइदोद्दीन गुलाम रसुल खाटीक याच्या घरातील ८ लाखाचे, शाकीराबी आरीफ शहा यांच्या घरातील ७ लाखाचे, रुक्सानाबी यासीन शहा यांच्या घरातील १० लाखाचे, आयशाबानो मोहम्मद अन्सारी यांच्या घरातील ५ लाखाचे आणि नियाज सैय्यद असलम यांच्या घरातील १० लाखाचे असे एकुण ७० लाखाचे नुकसान झाले. याप्रकरणी नदीम काल्या, हमीद नाट्या व वसीम रंधा या तिघांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >