मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ तालुक्याचे सुपुत्र लेफ्टनंट कमांडर सूरज वारंग यांचे विमान देखभालीमध्ये विशेष कौशल्य दाखवल्याबद्दल कौतुक केले आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेत, सिंधुदुर्ग मधील कुडाळ तालुक्याचे सुपुत्र लेफ्टनंट कमांडर सूरज वारंग यांचे विमान देखभालीमध्ये विशेष कौशल्य दाखवले आहे. या कामगिरीबद्दल नौदलाच्या वतीने त्यांचा ‘नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदक’ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांचे खूप अभिनंदन. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही निश्चितच आनंदाची व अभिमानाची बाब आहे,’ असे केंद्रीयमंत्री राणे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.