राज्यात दिवसभरात ६९९ नवे कोरोनाबाधित

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ६९९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
रुग्ण बरे होत असताना मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सोमवारी राज्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी यामध्ये थोडी वाढ झाली असून राज्यात १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



राज्यात आजपर्यंत ६४ लाख ८८ हजार ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के झाले आहे. आजपर्यंत राज्यात १ लाख ४१ हजार १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूचे प्रमाण २.१२ टक्के झाले आहे. सध्या राज्यामध्ये ६ हजार ४४५ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ६२ लाख ५५ हजार ५५४ प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये ६६ लाख ३९ हजार ९९५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या राज्यात ७७ हजार ६४२ जण होम क्वारंटाईन आहेत. तर ८९६ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत.

Comments
Add Comment

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय