
मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ६९९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होत असताना मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सोमवारी राज्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी यामध्ये थोडी वाढ झाली असून राज्यात १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत ६४ लाख ८८ हजार ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के झाले आहे. आजपर्यंत राज्यात १ लाख ४१ हजार १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूचे प्रमाण २.१२ टक्के झाले आहे. सध्या राज्यामध्ये ६ हजार ४४५ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ६२ लाख ५५ हजार ५५४ प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये ६६ लाख ३९ हजार ९९५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या राज्यात ७७ हजार ६४२ जण होम क्वारंटाईन आहेत. तर ८९६ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत.