पणजी : थर्टी फर्स्ट म्हटले की सगळयांच्याच नजरेसमोर येते ती मजा आणि मस्ती. त्यात गोवा हे ठिकाण पर्यटनाच्या आणि थर्टी फस्टच्या दृष्टीक्षेपात असेल तर आणखीच आनंद आणि उत्साहात भर म्हणावी लागेल. मात्र यावर्षी ओमायक्रॉनच्या दहशतीमुळे गोव्यात येणा-या पर्यटकांच्या उत्साहावर पाणी फेरल्याचं दिसून येत आहे.
दरवर्षी नाताळ, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात येतात, पण आता गोव्यात ओमायक्रॉनने दहशत निर्माण केली आहे. नवीन वर्ष येण्याआधीच येथील टूरिस्टची पावले माघारी वळू लागलेली दिसून येत आहेत. त्यामुळे गोव्यातील बहुतेक हॉटेल आणि क्लब ओस पडलेली दिसून येत आहेत.