Saturday, April 19, 2025
Homeमहत्वाची बातमीओमायक्रॉनमुळे लहान मुलांमधील कोरोना संसर्गात वाढ

ओमायक्रॉनमुळे लहान मुलांमधील कोरोना संसर्गात वाढ

भारतातही पाच वर्षांखालील मुलांना धोका?

बेल्जियम : जगभरामध्ये जवळजवळ ४० देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिकेमधील नऊ पैकी सात राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून मागील दोन दिवसांमध्ये २३ देशांमध्ये कोरोनाच्या या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमधील कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.

जगभरामध्ये सध्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन विषाणूची दहशत पाहता, अनेक देशांमध्ये लॉकडाउन किंवा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. युरोपबरोबरच पाश्चिमात्य देशांमधील नाताळाच्या उत्साहावर कोरोनाच्या या नवीन विषाणूचे सावट दिसून येत आहे.

ब्राझीलमधील ३१ डिसेंबरचा उत्सव यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर दुसरीकडे बेल्जियममध्ये कोरोना रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाल्याचे चित्र दिसत आहे.

लहान मुलांमधील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, येथील सहा वर्षांवरील सर्व मुलांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच देशामधील प्राथमिक शाळा २० डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर माध्यमिक शाळा दिवसाआड सुरू राहणार आहेत.

भारतातही पाच वर्षांखालील मुलांना धोका?

ओमायक्रॉन विषाणूचा वाढता धोका पाहता, जशी दक्षिण आफ्रिकेतील बालकांना ओमायक्रॉनची लागण होत आहे, तशा पद्धतीने भारतासह इतर देशातल्या बालकांना होणार नाही, असा दावा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. सुमित्रा दास यांनी केला आहे.

ओमायक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेतल्या पाच वर्षांखालील मुलांना लागण होण्याचं प्रमाण चिंताजनक आहे. दरम्यान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज या संस्थेने सांगितले की, ओमायक्रॉनची लागण सर्वच वयोगटातील लोकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, पाच वर्षांखालील मुलांमध्ये बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सध्या जगभरात चिंतेचा विषय बनला असून दक्षिण आफ्रिकेतील लहान मुलांनाही या विषाणूची लागण होत असल्याने इतर देशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशामध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत १६ हजार ५५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २५ जणांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला असून, लहान मुलांनाही संसर्ग होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -