नवी दिल्ली : गेल्या 24 तासात 24,55,911 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 127.93 (1,27,93,09,669) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 1,32,86,429 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 8,834 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,40,69,608 झाली आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.35% झाला आहे.
सलग 162 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे. गेल्या 24 तासात 8,306 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 98,416 आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.28% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.
गेल्या 24 तासांमध्ये एकूण 8,86,263 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 64.82 (64,82,59,067) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.78% असून गेल्या 22 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.94% असून गेले 63 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 98 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत 139 (1,39,02,60,790) कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 21 (21,06,50,896) कोटी न वापरलेल्या उपयोगी मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…