मुंबई : विश्वविक्रमी कामगिरी केल्याबद्दल न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू एजाझ पटेलचा मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए)मुंबई क्रिकेट असोसिएशनने भारत-न्यूझीलंड सामन्यातील स्कोअरशीट आणि मोमेंटो देऊन सत्कार केला. एमसीए अध्यक्ष विजय पाटील यांनी त्याला गौरवले.
वानखेडेवरील दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावातील सर्वच्या सर्व १० विकेट घेत एजाझने भारताचे माजी महान लेगस्पिनर अनिल कुंबळे तसेच इंग्लंडचे माजी गोलंदाज जिम लेकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. १९५६ मध्ये लेकर यांनी (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रॅफर्डवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि १९९९मध्ये कुंबळे यांनी(२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध दहा विकेट घेण्याची करामत साधली होती.
पटेलची मुंबई असोसिएशनला जर्सी आणि चेंडू भेट
एजाझनेही स्वाक्षरी केलेली जर्सी आणि चेंडू मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात आठवण म्हणून दिली. याशिवाय भारताचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने भारताच्या सर्व क्रिकेटपटूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी एजाझला भेट दिली.