राजस्थान सवाई माधोपूर येथे ७ ते ९ डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा ७०० वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे.
७ डिसेंबरला संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबरला मेहेंदी आणि ९ डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. १० डिसेंबरला रिसेप्शनने या उत्सवाची सांगता होणार आहे. विकी आणि कतरिनाने शाही विवाहसोहळ्याआधी कोर्ट मॅरेज केले असल्याचे बोललं जातं आहे.