Wednesday, July 9, 2025

लग्नासाठी कतरीना आणि विकी कौशल राजस्थानला रवाना

लग्नासाठी कतरीना आणि विकी कौशल राजस्थानला रवाना
मुंबई : बॉलीवूडमधलं मोस्ट अवेटेड मॅरेज म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचं . दोघांच्या लग्नाची चर्चा गेले कित्येक दिवस बीटाऊनमध्ये चर्चेत होती आणि अखेर आता हे दोघे लगीनगाठीत बांधले जाणार आहेत. राजस्थानमध्ये होते असलेल्या या शाही सोहळ्यासाठी विकी कौशल आणि कतरिना कैफ रवाना झाले आहेत. जोधपूरला जात असताना दोघेही विमानतळावर दिसून आले . विमानतळावर दोघांनी फोटोसाठी छान फोटोसाठी पोझदेखील दिल्या आहेत.

राजस्थान सवाई माधोपूर येथे ७ ते ९ डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा ७०० वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे.

७ डिसेंबरला संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबरला मेहेंदी आणि ९ डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. १० डिसेंबरला रिसेप्शनने या उत्सवाची सांगता होणार आहे. विकी आणि कतरिनाने शाही विवाहसोहळ्याआधी कोर्ट मॅरेज केले असल्याचे बोललं जातं आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >