बंगळुरू : कोरोनाचा नवा व्हेरिएंटने बाधित होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कर्नाटकमधील सरकारी शाळा आणि वैद्ययकीय महाविद्यालयात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्या वाढून 101 वर पोहोचली आहे. यामध्ये 90 विद्यार्थी आणि 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती चिक्कमंगळुरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उमेश यांनी दिली आहे. संक्रमित झालेल्या व्यक्तींचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, संक्रमित झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही संक्रमित विषाणूची लक्षणे आढळली नसून, कोणीही घाबरण्याची गरज नसल्याचे चिकमंगळुरूचे उपायुक्त के.एन. रमेश यांनी सांगितले आहे. या ठिकाणी वैद्यकीय पथके आणि रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. 450 निवासी विद्यार्थ्यांची नोंद असलेली शाळा सील करण्यात आली असून सॅनिटाइझही करण्यात आली आहे. तसेच, संक्रमित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना वसतिगृहाच्या एका भागात क्वारंटाइन करण्यात आले आहे.