Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

काय आहेत राज्य सरकारचे नवे नियम ?

काय आहेत राज्य सरकारचे नवे नियम ?

मुंबई :  ओमायक्रॉन रुग्णाची वाढती संख्या पाहाता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राज्य सरकारने प्रवाशांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारकडून दक्षिण आफ्रिकासह 11 देशांना हाय रिस्कमध्ये ठेवलं आहे. या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कठोर नियमावली जारी करण्यात आली आहे.



30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नियमांवलीमध्ये राज्य सरकारने दोन देशांना हाय रिस्कमध्ये ठेवण्यात आलं होतं. याची संख्या आता 11 करण्यात आली आहे.


सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर या चाचणीमध्ये ओमायक्रॉनची बाधा झाल्याचा रिपोर्ट आला तर सक्तीचं क्वारंटाईन करण्यात आलं आहे. प्रवाशाची चाचणी निगेटिव्ह आली तर सात दिवसांचं होम क्लारंटाईन करण्यात येईल. त्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा चाचणी कऱण्यात येईल. 

Comments
Add Comment