एमपीएससी परीक्षा २०२२ चे अंदाजित वेळापत्रक जाहीर

Share

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन २०२२ मध्ये घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर आज, शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले. एमपीएससी वर्षभरात वर्ग एक आणि दोन साठींच्या विविध संवर्गांसाठी साधारण १३ प्रकारच्या परीक्षा घेते. एमपीएससीची २०२१ वर्षाची राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी आणि मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी होईल. तसेच २०२२ ची राज्यसेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे.

अंदाजित वेळापत्रक पुढील प्रमाणे :

राज्यसेवा परीक्षा २०२१

पूर्व परीक्षा : २ जानेवारी २०२२

मुख्य परीक्षा : ७, ८ आणि ९ मे २०२२

दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१

पूर्व परीक्षा : १२ मार्च २०२२

मुख्य परीक्षा : २ जुलै २०२२

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

पूर्व परीक्षा : २६ फेब्रुवारी २०२२

मुख्य परीक्षा : ९ ते ३१ जुलै २०२२

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

पूर्व परीक्षा : ३ एप्रिल २०२२

मुख्य परीक्षा : ६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२२

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२२

मुख्य परीक्षा : २४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२२

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१

पूर्व परीक्षा : १६ एप्रिल २०२२

मुख्य परीक्षा : ३ जुलै २०२२

राज्यसेवा परीक्षा २०२२

पूर्व परीक्षा : १९ जून २०२२

मुख्य परीक्षा : १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२२

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

पूर्व परीक्षा : ८ ऑक्टोबर २०२२

मुख्य परीक्षा : २४ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

पूर्व परीक्षा : ५ नोव्हेंबर २०२२

मुख्य परीक्षा : ४ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३

महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

पूर्व परीक्षा : २६ नोव्हेंबर २०२२

मुख्य परीक्षा : १८ मार्च ते २३ एप्रिल २०२३

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२

पूर्व परीक्षा : १० डिसेंबर २०२२

मुख्य परीक्षा : ३० एप्रिल २०२३

Recent Posts

हवाई दलापोठापाठ भारतीय नौदलातही दाखल होणार राफेल विमानांचा ताफा

नवी दिल्ली : भारत सरकारने काही वर्षांपूर्वी हवाई दलाकरिता ३६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार…

7 minutes ago

Suraj Chavan: ‘या’ दिवशी पाहता येणार,फक्त ९९ रुपयांत; सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’

मुंबई: रीलस्टार सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक‘ चित्रपट तीन दिवसांपूर्वी लोकांच्या भेटीला आला…

36 minutes ago

‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती

पुणे: पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे निर्दश सरकारने दिले…

42 minutes ago

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, मच्छीमार बांधवांना किसान कार्डचे वाटप

मुंबई : महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला…

47 minutes ago

भारताचा ‘जलप्रहार’?, झेलमच्या रौद्र पाण्याने पाकिस्तानात हाहाकार

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…

2 hours ago

Breaking News : आधार, पॅन, वाहन परवाना एकाच ठिकाणी होणार अपडेट

नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…

3 hours ago