बीड : शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात मेटे यांनी स्वतःहून फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे.
मेटे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘कोरोना कालावधीमध्ये मागील दोन वर्षांपासून आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने कोरोनाच्या संसर्गापासून दूर होतो. परंतु शुक्रवारी सकाळी माझी आर.टी.पी.सी.आर. टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. माझी तब्येत चांगली आहे. काळजी नसावी. परंतु, मी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने मागील दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व आपली तसेच आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असल्याने यातूनही लवकरच बाहेर पडेन या विश्वासासह आपले मनःपूर्वक आभार…!’